You are currently viewing शारदा विद्यामंदिर शाळेत समर्थ कट्ट्याच्या माध्यमातून लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

शारदा विद्यामंदिर शाळेत समर्थ कट्ट्याच्या माध्यमातून लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

ठाणे :

शुक्रवार एक ऑगस्ट २०२५ च्या निमित्ताने शारदा विद्यामंदिरच्या सभागृहात लोकमान्य टिळक पुण्यतिथीचा व्याख्यान समारंभ संपन्न झाला. हा कार्यक्रम दुपारी बारा वाजता सुरू झाला. या कार्यक्रमाच्या व्याख्यात्या सुप्रसिद्ध लेखिका प्रा.सौ. प्रज्ञा पंडित होत्या. आपल्या सुमधुर वाणीतून प्रज्ञाताईंनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. छोट्या छोट्या गोष्टींमधून विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेत. प्रज्ञाताई बोलत होत्या. त्या संवाद साधत असताना प्रत्येकाला असे वाटत होते की त्यांनी कधी थांबू नये. इतके सुंदर व्याख्यान त्यांनी याप्रसंगी दिले. प्रज्ञाताईंनी लोकमान्य टिळकांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला विद्यार्थ्यांसमोर उलगडले. त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. लोकमान्य टिळक एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व! यामधून त्यांनी टिळकांच्या जीवनातले आणि स्वातंत्र्याच्या चळवळीचे वेगवेगळे प्रसंग सांगत विद्यार्थ्यांना एकाग्र केले.

 

हा कार्यक्रम शारदा विद्यामंदिरच्या सहकार्यातून चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट आणि नाट्यतुषार यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला ठाण्यातील ज्येष्ठ उद्योजक नारायण चांग यांनी शुभ आशीर्वाद देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना अल्पोपहार दिला गेला. चैतन्य चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रुपेश पवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की नाट्यतुषार आणि चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट या दोन संस्थांनी एकत्र येऊन समर्थ कट्ट्याची स्थापना केली आहे. या शुभकार्याचे उद्घाटन आम्हाला शारदा विद्यामंदिरमध्येच करायचे होते. त्यामुळे आम्हाला आज शारदा देवीचा आशीर्वाद मिळाला आहे. लोकमान्य टिळकांबद्दल बोलताना ते म्हणाले. बालवयापासून मला लोकमान्य टिळक हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व फार आवडायचे. म्हणून टिळकांना मी प्रति शिवाजी महाराज असे मानतो. कारण स्वातंत्र्याच्या चळवळीला त्यांच्यापासून खरी जहाल सुरुवात झाली. समर्थ कट्टा या उपक्रमाला प्रज्ञा पंडित पुढे सहकार्य देणार आहेत. असे पवार यांनी सांगितले. या कार्यक्रमाला रुपेश पवार यांचे वडील बाल विद्यामंदिरचे (किसन नगर) माजी अध्यक्ष बी के पवार, शालेय समितीचे निमंत्रित सदस्य ,राजेंद्र गोसावी,व बाळकृष्ण म्हसकर, उद्योजिका सौ.राधीका गोखले,व कांचन राणे,श्रीमती.संध्या म्हसकर हे सर्व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. गोखले मॅडम यांनी तिन हजार एक धनादेश द्वारे देणगी शारदा विद्यामंदिर संस्थेला दिली. यावेळी योगेश्रवरी बन व त्यांच्या लिटिल स्टार कन्या वज्रेश्वरी, रत्नेश्वरी यांनी आयत्यावेळी कार्यक्रमाचे खेत्रीकरण करून योगदान दिले. त्यांच्या कलात्मक कार्यासाठी दोन बाल कलावतींचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शारदा विद्यामंदिराच्या

मुख्याध्यापिका सौ सविता सोनवणे यांनी भूषवले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मोनिका पाटील यांनी केले. शारदा विद्या मंदिरच्या सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमाला उत्तम सहकार्य दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे कान लावून व्याख्यान शांतचित्ताने ऐकले. ते पाहून उपस्थितांना आणि व्याख्यात्या प्रा.प्रज्ञा पंडित यांना समाधान वाटले. अशाप्रकारे भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी शारदा विद्यामंदिरमध्ये साजरी झाली. शारदा विद्यामंदिर ही गरीब गरजू मुलांची निवासी शाळा आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा शालेय खर्च सामाजिक सहकार्यातून होतो. त्यामुळे ठाणेकर मंडळींनी या शाळेला भरभरून आर्थिक मदत व शैक्षणिक साहित्य द्यावीत. असे आवाहन चैतन्य चॅरिटेबल ट्रस्टने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा