You are currently viewing सावंतवाडीत ठाकरे सेनेचं “बॅड-बाजा बारात” आंदोलन – मायकल डिसोझा

सावंतवाडीत ठाकरे सेनेचं “बॅड-बाजा बारात” आंदोलन – मायकल डिसोझा

सावंतवाडीत ठाकरे सेनेचं “बॅड-बाजा बारात” आंदोलन – मायकल डिसोझा

प्रशासनाच्या निष्क्रीयतेविरोधात ८ ऑगस्टला निदर्शने

सावंतवाडी
सावंतवाडीतील प्रशासनाच्या निष्क्रियतेला व विकासकामांकडे होत असलेल्या दुर्लक्षाला विरोध करण्यासाठी ठाकरे गटाच्या शिवसेनेने “बॅड-बाजा बारात” आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या ८ ऑगस्टला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयापासून या आंदोलनाची सुरुवात होणार असून, यानंतर तहसील कार्यालय, पंचायत समिती यांसारख्या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुकाप्रमुख मायकल डिसोझा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डिसोझा यांनी सत्ताधारी भाजप व शिंदे गटावर टीका करताना सांगितले की, “लोकांचे प्रश्न बाजूला ठेवून हे पक्ष केवळ कार्यकर्ते फोडण्यात मश्गुल आहेत. रस्ते, आरोग्य, व इतर विकासकामांकडे कोणीही लक्ष देत नाही.”
त्यांनी स्पष्ट केलं की, पाच वर्षांपासून निवडणुका झाल्या नाहीत, त्यामुळे प्रशासनाकडेच सारा कारभार आहे. परिणामी, उत्तरदायित्वाचा अभाव असून सामान्य नागरिकांचे प्रश्न प्रलंबित राहतात.

या पत्रकार परिषदेला उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, शहरप्रमुख शैलेश गवंंडळकर, संघटक निशांत तोरसकर व अशोक धुरी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा