You are currently viewing तिकीट रांगेत वादातून दोन तरुणांत हाणामारी

तिकीट रांगेत वादातून दोन तरुणांत हाणामारी

तिकीट रांगेत वादातून दोन तरुणांत हाणामारी;

कणकवली रेल्वे स्थानकावर तणावाचे वातावरण

कणकवली

कणकवली रेल्वे स्थानकावर मंगळवारी संध्याकाळी तुतारी एक्सप्रेससाठी तिकीट घेत असताना दोन तरुणांमध्ये बाचाबाची होऊन हाणामारी झाली. नागपंचमीच्या निमित्ताने प्रवाशांची मोठी गर्दी असल्यामुळे तिकीट काउंटरसमोर लांबच लांब रांग लागली होती. रांगेत एका तरुणाने पुढे घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे दुसऱ्या तरुणाचा संताप झाला आणि वाद निर्माण झाला. काही क्षणातच दोघांमध्ये मारामारी सुरू झाली.

या घटनेमुळे स्थानकावर काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. रेल्वे सुरक्षा बलाने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, कणकवली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक असल्याने प्रवाशांची नेहमीच मोठी गर्दी असते. त्यामुळे तिकीट काउंटरची संख्या वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधले जाणार असल्याचे तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुरेश सावंत आणि पदाधिकारी संजय मालंडकर यांनी सांगितले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा