You are currently viewing मैत्रीची पारख

मैत्रीची पारख

*ज्येष्ठ साहित्यिक, संपादक बाबू फिलिप्स डिसोजा कुमठेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*मैत्रीची पारख*

मैत्री जशी होती कृष्ण सुदामा
राव रंक असा भेद नसावा
संकट काळी जो येतसे कामा
इथे खरा मित्र तोच मानावा
-१-
वाद झाले तरी नको दुरावा
मैत्रीचा गोडवा मनी असावा
नको खुलासा वा नको पुरावा
विश्वास तो वर्तनात दिसावा
-२-
खरा सल्ला देतो मित्र कठोर
नको शंका घ्यावी कधी मैत्रीची
संपवू पाहतो तो जीवाचा घोर
अतूट असावी गाठ मैत्रीची
-३-
भौगोलिक अंतर असो किती
संवाद आपसात व्हावा नित्य
क्षेमकुशल विचारांची रीती
न घडावे अघटित,अचिंत्य
-४-
न विझावा दिवा कधी मैत्रीचा
मैत्रीचे विश्व जीवीचा विसावा
ठरो आदर्श जगात मैत्रीचा
मैत्रीचा गोडवा मनी असावा
-५-
बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर
पुनावळे पुणे ३३

प्रतिक्रिया व्यक्त करा