फोंडाघाट एस.टी. स्टॅंड पाहणीसाठी समिती दाखल; अजित नाडकर्णी यांचे महत्त्वाचे निवेदन
फोंडाघाट
फोंडाघाट एस.टी. स्टॅंडची पाहणी करण्यासाठी विशेष समिती दाखल झाली. या समितीत कोल्हापूर विभागाचे प्रमुख श्री. कामतोडे, कणकवली विभागाचे श्री. गायकवाड, फोंडाघाटचे कंट्रोलर श्री. राठोड आणि शिवाजी पवार उपस्थित होते.
निवेदनात पुढील मुद्दे मांडण्यात आले:
एस.टी. स्टॅंडवरील सर्व खड्डे बुजवून कणकवलीप्रमाणे पेव्हर ब्लॉक बसवावेत.
शुद्ध पाण्याची योग्य व्यवस्था करण्यात यावी.
रात्रीच्या वेळेस भटक्या कुत्र्यांचा व ढोर जनावरांचा त्रास टाळण्यासाठी योग्य नियोजन करावे.
टॉयलेट दिवसातून दोन वेळा स्वच्छ करण्यात येते, तरीही दुर्दशा होते; त्या ठिकाणी माणूस नियुक्त करावा किंवा सुलभ शौचालय म्हणून विकसित करावे.
स्टॅंडवरील रेस्टॉरंट पुन्हा सुरू करण्यात यावे.
श्री. अजित नाडकर्णी यांनी या सर्व बाबी समितीकडे मांडत, गणेश चतुर्थीपूर्वी हे सर्व कामे पूर्ण करण्यात यावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
दोन्ही विभागांचे कंट्रोलर चांगले काम करत असल्याने १५ ऑगस्ट रोजी त्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला जाणार आहे. चर्चा सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. या चर्चेत राजू पटेल आणि श्री. बबन मामा हळदिवे यांनीही सहभाग घेतला.
या सकारात्मक संवादातून निश्चितच काहीतरी चांगले घडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री मा. नितेश राणे यांनाही पाठविण्यात येणार आहेत.
— अजित नाडकर्णी, संवाद मीडिया ✒️

