You are currently viewing महाराष्ट्राचे मॉरिशस फोफसंडी येथे नक्षत्र काव्य पाऊस सहल संपन्न

महाराष्ट्राचे मॉरिशस फोफसंडी येथे नक्षत्र काव्य पाऊस सहल संपन्न

पुणे :

नक्षत्राचं देणं काव्यमंच, मुख्यालय, भोसरी, पुणे वतीने निसर्गाचा आनंद व पावसात मनसोक्त भिजण्यासाठी पावसाळी सहल आयोजित करण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे निसर्गाची भटकंती करण्यासाठी वेगवेगळ्या सहलींचे आयोजन करण्यात येते. यावेळेस महाराष्ट्राचे मॉरिशस-फोफसंडी या अतिदुर्गम भागामध्ये “नक्षत्र पाऊस काव्य सहलीचे” आयोजन करण्यात आले होते.

सकाळी सर्व नक्षत्र या काव्य सहलीला निघाली. शिवजन्मभूमी जुन्नर येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून फोफसंडी कडे रवाना झाली. प्रचंड पाऊस कोसळत होता, शेकडो धबधबे आणि अंगाला झोंबणारा गार वारा या सर्व गोष्टींचा अनुभव घेत. मनसोक्त पावसात भिजण्याचा आनंद घेण्यात आला. यावेळी स्थानिक शेंगोळी, बाजरीभाकरी, चटणी, शिरा, पापड, भात, लोणचे, कढी या स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेतला.

फोफसंडी गावात पोचल्यावर तेथे कवितांचं वाचन करण्यात आलं. कवी वादळकार, सुरेंद्र विसपुते, यशवंत घोडे यांच्या प्रेम, पाऊस, जीवन, निसर्ग कवितांनी चांगलीच दाद मिळवली. स्थानिक गाईड यांनी खूप सर्व गावाचं महत्व सांगितलं. फोफ हाऊस, कोंबड किल्ला, मांडवी ऋषी गुहा, मांडवी नदी उगम, आसपास सर्व किल्ले टेकड्यांची व धबधब्यांची माहिती देण्यात आली.अनेक धबधबे त्यांची नावे आणि या गावाचा इतिहास अनुभवत सर्व नक्षत्र परतीच्या प्रवासाला निघाली.

या नक्षत्र पाऊस काव्य सहलीमध्ये सौ.अलका खोसे, सुनील थोरात, ऋचा भोसले, सौ दिव्या भोसले, सौ प्रिती सोनवणे, चि.साईराजे सोनवणे, सौ.संगिता सोनवणे, राजेंद्र सोनवणे, प्रताप जगताप, संपत नायकोडी, सचिन फुल पगार, ज्ञानेश्वर काजळे, किसन शिंगोटे, सौ.संगीता शिंगोटे, विजया सोनटक्के, प्रशांत सोनटक्के, प्रतिक्षा विसपुते, सुरेंद्र विसपुते, विजया माळवदकर, अशोक कुलकर्णी, बबन चव्हाण, बाळू गावडे, सौ.सविता गावडे, श्वेता साठे, रोहन साठे, तेजल देडगांवकर, विजया माळवदकर, सुनिता पांढरकर, अशोक पांढरकर, सुमन शिंगेवार, अनुराग मिश्रा इ.नी सहभाग घेऊन काव्य पाऊस सहलीचा आनंद लुटला. या संयोजन प्रा राजेंद्र सोनवणे, यशवंत घोडे, सुरज वाजे, अभिषेक घोडे, रोशन तुपे इ.नी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा