You are currently viewing दाणोली बाजारवाडी बूथतर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप उपक्रम

दाणोली बाजारवाडी बूथतर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप उपक्रम

संदिप गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम

सावंतवाडी :

भाजप नेते संदिप गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त दाणोली बाजारवाडी बूथच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर व औषध वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन खुद्द संदिप गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी केसरी विकास सोसायटीचे संचालक दीप्तेश सुकी, बूथ अध्यक्ष प्रसाद सुकी, विकास सोसायटीच्या संचालिका दीपा सुकी, डॉ. योगिता राणे, निशिकांत बिले, भरत गोरे, निहाल शिरसाट, वसंत बिले आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विविध आजारांची तपासणी, प्राथमिक औषधोपचार आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले. गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा