*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
अनुष्टुभ छंद
*नश्वर*
देह जातो अभंगात्मा
तो न जळे कधी कसा
देहपूजा कशाला ती
आत्म्याचे सुख जाणशी १
धावतो मी फुकाचा रे
कशास ना मला कळे
वाटले जे मिळाले ते
सारे होते क्षणातले… २
संचियेले धनाला मी
अडकलो सुखावलो
अचंबित कितीवेळा
तरी नाही निवांतलो..३
जगलो मी स्वत:साठी
चौकटीत अरुंदित
विसरलो निरंताला
जे खरे ते अखंडित..४
राधिका भांडारकर

