You are currently viewing सण नागपंचमीचा

सण नागपंचमीचा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य प्रा.सत्यवान घाडी लिखित अप्रतिम अष्टाक्षरी काव्य*

🐍🐍 *सण नागपंचमीचा* 🐍🐍

***************

 

नागपंचमीचा सण

येई श्रावण मासात

नागोबाची पूजा करू

घालू रांगोळी थाटात।।१।।

 

दूध-लाह्या प्रसादाचा

त्याला नैवेद्य अर्पूण

भक्तिभावे नमू त्याला

मित्र होऊन संपूर्ण।।२।।

 

करी राखण शेताची

शेतकरी होई सुखी

धनधान्य भरे घरी

पडे सर्वांच्या हो मुखी।।३।।

 

शंभू महादेवाच्या तो

शोभे गळ्यातील हार

शेष नाग सागरात

घेई विष्णूचा तो भार।।४।।

 

व्रत करती ललना

बंधू-सखा समजून

झिम्मा फुगडी खेळती

रात्री जागर करून।।५।।

 

चला चला गं सयानू

घुमवुया ती घागर

नाग राजा डोले आज

पहा तिच्या तालावर।।६।।

 

झिम्मा फुगडी खेळुया

झिम्मा फुगडी खेळुया

गाणी मंगळा गौरिची

सारा श्रावण गाऊया।।७।।

 

🐍🐍🐍🐍🐍🐍🐍🐍🐍🐍🐍

*रचना*:- प्रा.सत्यवान शांताराम घाडी.

*गांव*:- किजवडे, घाडीवाडी, देवगड.

*ठाणे*:- दिवा.

 

🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺

प्रतिक्रिया व्यक्त करा