फलाटांवर गावांचे नामफलक लावण्याचे आश्वासन; वाहतूक नियंत्रकांची तात्काळ सकारात्मक प्रतिक्रिया
बांदा :
स्थानकातील फलाटांवर गावांचे नामफलक नसल्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबाबत वाहतूक नियंत्रक प्रकाश नार्वेकर व रमेश भोसले यांना निवेदन सादर करण्यात आले. प्रवाशांची अडचण लक्षात घेता, त्यांनी सकारात्मकता दाखवत तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि येत्या दोन दिवसांत गावांचे नामफलक लावण्याचे ठोस आश्वासन दिले.
या निवेदनप्रसंगी बांदा मंडल क्रीडा संयोजक गुरु कल्याणकर, शहर अध्यक्ष नरसिंह उर्फ बाबा काणेकर, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, प्रशांत बांदेकर, सिद्धेश महाजन, बूथ अध्यक्ष राकेश केसरकर, शहर उपाध्यक्ष शैलेश केसरकर आणि हेमंत दाभोलकर हे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्थानकावर गावांची स्पष्ट ओळख दर्शवणारे नामफलक लावल्यास प्रवाशांना दिशा ओळखण्यास व प्रवास सुलभ करण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी या सकारात्मक निर्णयाचे स्वागत केले आहे.
