You are currently viewing प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांची ‘शेवटची लाओग्राफिया’ कादंबरी इंग्रजीत प्रकाशित

प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांची ‘शेवटची लाओग्राफिया’ कादंबरी इंग्रजीत प्रकाशित

*प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांची ‘शेवटची लाओग्राफिया’ कादंबरी इंग्रजीत प्रकाशित*

पिंपरी

पिंपळे सौदागर स्थित ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांची प्रसिद्ध कादंबरी ‘शेवटची लाओग्राफिया’चा इंग्रजी अनुवाद ‘द लास्ट फोकटेल'(The Last Folktale) या शीर्षकाने प्रसिद्ध झाला आहे. या अनुवादाचे कार्य ज्येष्ठ अनुवादक डॉ. विलास साळुंखे यांनी केले असून ही कादंबरी नुकतीच नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्था ऑथर्स प्रेस यांच्याकडून प्रकाशित करण्यात आली आहे.
‘लाओग्राफिया’ ही कादंबरी मूळ मराठीत २०२२ मध्ये अथर्व पब्लिकेशन, जळगाव यांनी प्रसिद्ध केली होती. या कादंबरीस मराठीतील अनेक ज्येष्ठ समीक्षकांकडून गौरव मिळाला असून, तिला अनेक राज्यस्तरीय पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. आता ही बहुचर्चित कादंबरी इंग्रजी वाचकांसाठी खुली झाल्यामुळे मराठी साहित्यातील समृद्ध परंपरेचे दर्शन आंतरराष्ट्रीय स्तरावर झाले आहे. उत्तराधुनिक शैली, मनोविश्लेषण, लोक-सांस्कृतिक दृष्टिकोन यामुळे ‘द लास्ट फोकटेल’ ही वेगळी साहित्यकृती
ठरते. हा केवळ इंग्रजीतील एक अनुवाद नसून मराठी भाषेचे वाङ्मयिक वैभव जगासमोर सादर करणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या कादंबरीचे स्वागत जागतिक पातळीवरील वाचकांकडून होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या निमित्ताने मराठी साहित्याचे पाऊल आंतरराष्ट्रीय व्यासपीठाकडे टाकले गेले असून, भाषेच्या सीमांना ओलांडत मराठीचा झेंडा उंचावला गेला आहे. यापूर्वी प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांची सतरा पुस्तके प्रकाशित झालेली असून साहित्यिक म्हणून त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार आणि मानसन्मान प्राप्त झालेले आहेत.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा