You are currently viewing परुळेबाजार ग्रामपंचायतीला ‘कोकण विभागीय पुरस्कार जाहीर’

परुळेबाजार ग्रामपंचायतीला ‘कोकण विभागीय पुरस्कार जाहीर’

१२ ऑगस्टला पनवेल येथे पुरस्कार वितरण

वेंगुर्ला :

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत कोकण विभागीय स्पर्धेत सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त करणार्‍या ग्रामपंचायत परुळे बाजार चा कोकण विभागाचे सन्मान १२ ऑगस्ट २०२५ रोजी कोकण विभागाच्या पनवेल येथील कार्यक्रमात पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. कोकण विभागीय कार्यालय कडुन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. परुळे बाजार ग्रामपंचायतीने राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत द्वितीय क्रमांक सन २०१९/२० व २०२०/२१ व २०२१/२२ अशी सलग दोन वर्ष यश मिळवले आहे. सदर कार्यक्रम विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवर यांच्या उपस्थितीत होणार आहे.यावेळी मा. गटविकास अधिकार ग्रामपंचायत अधिकारी विद्यमान/सरपंच उपसरपंच सदस्य तत्कालीन सरपंच उपसरपंच यानी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा