You are currently viewing श्रावणाचे स्वागत

श्रावणाचे स्वागत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*श्रावणाचे स्वागत* 

 

आला श्रावणाचा मास

मनी आनंद भरला

गंध फुलांचा घेऊन

रान माळ बहरला

 

इवल्या इवल्या फुलांनी

कमानी त्या सजल्या

माळावर बांधावर

रानवेली पहुडल्या

 

नागमोडी वळनांनी

मुरकती रानवाटा

झूळूझूळु ओहळात

पाण्याच्या लहरती लाटा

 

फुले अबोलीची सान

फांदीवरती डोलती

पर्ण भाराच्या आडून

कोकिळ पंचम सूर गाती

 

इंद्र धनु ची कमान

रंग रंगानी खुलते

निरभ्र आभाळात

बलाकमाला उडते

 

आला श्रावणाचा मास

सण वार दिस आले

मोद मनात भरला

देव्हारी दिवे लागले

 

*शीला पाटील. चांदवड.*

प्रतिक्रिया व्यक्त करा