पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सांगेन; पण मागे हटणार नाही
सावंतवाडी /नितेश दळवी :
आजगाव येथे भरधाव डंपर ने चार गाड्यांना धडक दिली. या भीषण अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला तर तिघे जण गंभीर जखमी झाले. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते नारायण राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपर वाहतुकी विरोधात जनहित याचिका दाखल करणार, आपली भूमिका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही समजून सांगणार पण मागे हटणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
कळणे माईन्स वाहतूक करणाऱ्या डंपर चा भीषण अपघात झाला. एक महिला मृत झाली. तर काही जखमी झालेत. ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. भरधाव वेगाने डंपर चालवणारा चालक नशेत होता.
यापूर्वीही असेच अनेक अपघात या कळणे किंवा साटेली मायनिंग यातून झालेले आहेत. परवाच एक न्हावेली ला अपघात झाला. दुचाकीस्वाराला उडवले गेले.
नारायण राणे म्हणाले, मायनिंग चेक पोस्ट उभारावेत की, जे डायव्हर अमली पदार्थ सेवन करतात त्यांची तपासणी केली पाहिजे. आणि नंतर तो ड्रायव्हर नशेत असला तर गाडी बाजूला घेऊन त्या ड्रायव्हरला पोलिसांच्या ताब्यात दिले पाहिजे.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे 66 नंबरचा हायवे सोडला तर नंतर जी उर्वरित मायनिंग ची वाहतूक होत आहे. तो रस्ता पूर्णपने अरुंद आहे. गर्दीच्या ठिकाणाहून मळगाव, न्हावेली, मळेवाड, आजगाव, शिरोडा याठिकाणी रस्ता अत्यंत अरुंद आहे. त्यामुळे हे अपघात घडतात. यावर एकच उपाय योजना आहे, ती म्हणजे मायनिंगला स्वतः त्यांनी आपला रेल्वे ट्रॅक घालावा मग तो टेम्पररी असेल किंवा परमनेंटली असेल जे काय असेल त्यांनी रेल्वे ट्रॅक घालावा आणि रेल्वे ट्रॅक घालून वाहतूक करावी तरच रस्ते अपघाताचे प्रमाण कमी होईल. अन्यथा आतापर्यंत अनेक जिव ह्या मायनिंग च्या लोकांनी घेतले आहेत. ते स्वतः गब्बर श्रीमंत झाले आहेत. मायनिंग चे एजंट आहेत. काही ठिकाणी मायनिंगच्या एजंटनी काही लोकांना धरून आपली वाहतूक सुरळीत करून घेतात. काही काळ वाहतूक अडवली जाते. त्यानंतर मग ते एजंट जातात. काही ठराविक लोकांना भेटतात आणि हे आज अव्याहतपणे चालू आहे. “एक लक्षात घ्या मी तुम्हाला एकच विनंती करेन मनुष्य प्राण्याचा जीव हा अमूल्य आहे. जगात कुठलीही अशी एजन्सी नाही कोणी व्हॅल्यूएवर जगात नाही की मनुष्यप्राण्याच्या जीवाची किंमत ठरवू शकत नाही. एवढी मोठी मनुष्य प्राण्याच्या जीवाची किंमत आहे. ही सर्व जीवित हानी थांबायला हवी असेल, लोकांचे संसार उध्वस्त व्हायची नसतील.” तर ही उपाययोजना करण्यासाठी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला कोर्टाची पायरी झिजवाविच लागेल. याबाबतची जनहित याचिका मी स्वतः दाखल करीन मला. त्यासाठी खरोखरच जे समाजसेवक असतील तर त्यांनी मला एक मोरल सपोर्ट द्यावा. मी कुठलीही अपेक्षा करणार नाही. मला आर्थिक दृष्ट्या इकॉनोमिकली मदत नको. माझ्या स्वतःच्या श्रमाची पैसे खर्च करून मी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार आहे.
*ज्या पक्षात तुम्ही आहात त्या पक्षाचे तालुकाप्रमुख असतील किंवा जिल्हाप्रमुख असतील त्या पक्षाची भूमिका काय असेल?* असे विचारले असता,
ते म्हणाले, मी माझ्या पक्षाचे पदाधिकारी असतील त्यांना स्पष्ट सांगेन तुम्ही या बाबतीत मला पूर्णपणे पाठिंबा दिला पाहिजे.