नात्याची कमी
माणसे वाढत गेली,
माणुसकीची नाही हमी.
कुठलंच नातं करत नाही,
पूर्ण एका नात्याची कमी.
छोट्या छोट्या आघातांचे,
घाव लागतात वर्मी.
हृदय कमजोर झाले की,
त्यात उरते फक्त नमी.
जोडून ठेवायची म्हटलं तरी,
नाती दुभंगली जातात.
स्वार्थासाठी दूर व्हायची,
संधी शोधतात नामी.
हवेत उडणाऱ्या पाखरांना,
धरणीची नसते ओढ.
थकून येतात विसाव्याला,
घ्यावया घरट्यातली गर्मी.
एकांती हा प्रवास जीवनाचा,
कुठंवर चालणार आहे.
नाती जपून ठेवली तर,
येतील अडचणीत कामी.
कुठलंच नातं करत नाही,
पूर्ण एका नात्याची कमी…!!
(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६