देवगड-
तालुक्यातील विजयदुर्ग बंदर गिर्ये बंदर विकास समन्वय समिती स्थापन करण्याकरिता देवगड विजयदुर्ग परिसरातील विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची सभा माजी सभापती सुनील पारकर यांच्या अध्यक्षतेखाली जामसंडे येथे पार पडली
या बैठकीत सर्वानुमते माजी आमदार अजित गोगटे यांची निवड अध्यक्षपदी करण्यात आली. या बैठकीला भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, सभापती रवी पाळेकर, भाजप सरचिटणीस आरिफ बगदादी, डॉ के.एन.बोरफळकर,प्रकाश राणे,सुधीर जोशी,उल्हास मणचेकर,जयदेव कदम, मिलिंद दांडेकर,व्यासपीठावर उपस्थित होते.
स्वागत मिलिंद दांडेकर यांनी तर प्रास्तविक अजित गोगटे यांनी करून आंबा, काजू,साखर यासारख्या वस्तू निर्यातीकरिता विजयदुर्ग बंदर विकसित होणे गरजेचे आहे असे स्पष्ट केले.या बैठकीत विजयदुर्ग सरपंच प्रसाद देवधर यांनी 20 वर्षांपूर्वी विजयदुर्ग बंदर प्रकल्प सविस्तर माहिती देऊन त्या प्रकल्पाचा पाठपुरावा करावा म्हणजे फणसे ते मुसाकाजी पर्यंतचा भाग यात येऊन तो विकसित होईल तसेच किमान150 जेटीचा हार्बर प्रोजेकट असावा असे मत मांडले.
या वेळी डॉ बोरफळकर यांनी ही समिती निववळ विजयदुर्ग गिर्ये बंदर विकास पुरती मर्यादित न रहाता देवगड तालुक्यातील रस्ते सुविधा सागरी महामार्ग, बाय पास रेल्वे मार्ग या बाबी मार्गी लावण्याकरिता प्रयत्न व्हावेत असेही नमूद केले.सुधीर जोशी यांनी देवगड तालुक्याचा पर्यटनदृष्टया विकास झालेला नाही .येथील गड किल्ले यांचे संवर्धन व्हावे तसेच लोकप्रतिनिधींची उदासीनता आहे त्यामुळे नेत्यांना जागे करावे लागेल व्याकरिता पाठपुरावा करणारी समन्वय समिती असावी असे सांगितले.या चर्चेत प्रमोद चव्हाण,उत्तम बिर्जे, प्रकाश राणे, आरिफ बगदादी, अनंत फडके, उल्हास मणचेकर यांनी चर्चेत सहभाग घेतला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात विजयदुर्ग गिर्ये बंदर विकास ही काळाची गरज असून त्यासाठी सर्वानी एकत्रित प्रयत्न करावे असे आवाहन केले.उर्वरित समिती पुढीलप्रमाणे निवडण्यात आली यात तालुका सभापती, नगराध्यक्ष,विजयदुर्ग, गिर्ये, रामेश्वर, हे पाच जण पदसिद्ध तसेच सल्लागार खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे, माजी मंत्री भाई गिरकर हे असतील, या व्यतिरिक्त अविनाश गोखले,संजय बोबडी, आरिफ बगदादी, उत्तम बिर्जे, रवी तिरलोटकर, संजय बांदेकर, उल्हास मणचेकर, मधुकर नलावडे, प्रमोद चव्हाण, संतोष कुलकर्णी, ज्ञानेश्वर खवळे, डॉ.अमोल तेली यांचा समावेश आहे.