*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*“संत सावता माळी”*
अरण गाव संतांची भूमी धन्य सावता संत
प्रेम सागर सावतोबा कर्मयोगी निष्ठावंतIIधृII
माता नंदिताबाई पिता पूरसोबा होत
आजोबा देवू माळींचे घराणे विठ्ठल भक्त
विठ्ठल भक्तिचा वसा लाभला बालवयांतII1II
बालपणा पासून रस घेती रमती शेतीत
भानवसे कुळांतील जनाईंशी झाले विवाहित
शेती करिती प्रपंचात राहून मनाने विरक्तII2II
अखंड विठ्ठल नाम घेत करिती कष्ट
कर्मयोगी रहाती रमती भजन कीर्तनांत
अभंग रचिले अनेक दंग विठ्ठल स्मरणांतII3II
पंढरीला जाणाऱ्यां सर्वांना करती अन्नदान
अखंड मुखी नाम न गेले पंढरपुरात
पांडुरंग येई भेटीला सावतोबांना मळ्यांतII4II
विठूचे रूप अतर्क्य हृदयकमळ सिद्ध
विठू नाम शब्द ब्रह्म साचे कलियुगांत
सावतोबा म्हणती नाम सोपे नको यात्रा तीर्थII5II
कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझे दैवत
स्वकर्मात व्हावे रत मोक्ष मिळे हातो हात
सावतोबा म्हणती आमची माळीयाची जातII6II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.
