विकसित महाराष्ट्र 2047 उपक्रमांतर्गत क्रीडा धोरणासाठी नागरिकांनी सूचना करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
“विकसित महाराष्ट्र 2047′ या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत क्रीडा क्षेत्रातील नागरिकांचे मौल्यवान मत व सूचना जाणून घेण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत विशेष प्रश्नावली तयार करण्यात आलेली आहे. ही प्रश्नावली Google Form द्वारे सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील सर्व स्तरांतील नागरिक, खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, क्रीडा क्षेत्रातील अभ्यासक, तसेच क्रीडाप्रेमींनी सहभाग सुनिश्चित करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सूचनांवर आधारित पुढील क्रीडा धोरण तयार करण्यात येणार आहे व राज्याच्या क्रीडा क्षेत्राला जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
Google Form लिंक: https://forms.gle/d9fcxXWje8AphqpX9 या लिंकमध्ये नागरिकांचे मत नमूद करण्याचे सुचित करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राशी संबंधित नागरीक, खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, क्रीडा अभ्यासक तसेच क्रीडाप्रेमींनी या उपक्रमात सहभागी होवून आपले अमुल्य मत नोंदवावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी केले आहे.
