*कर्करोगाची तपासणी व जनजागृती मोहिम व्हॅन दिनांक मंगळवार 28 जुलै रोजी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात…*
*मुखाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर ची होणार तपासणी*
सावंतवाडी
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यामध्ये कर्करोगाची तपासणी व जनजागृती मोहिम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये कॅन्सर तपासणीची सुविधा असलेली सुसज्ज कॅन्सर डायग्नोस्टीक व्हॅन जिल्ह्यातील ग्रामिण भागात जाऊन तेथील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याच्या मदतीने रुग्णांची तपासणी करणार आहे.
सदरील कॅन्सर डायग्नेस्टीक व्हॅन दि.०९ जुलै २०२५ ते एक महिना कालावधीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हामधील जिल्हा, उपजिल्हा, ग्रामिण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कर्करोग संशयीत लाभार्थ्यांची तपासणी करणार आहे. मा.श्री. अनिल पाटील (भा.प्र.से) जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी सदरील शिबिरास भेट देवून कामकाजाची पहाणी केली. सदर व्हॅनमध्ये तज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणीसह सर्व सुविधा उपलब्ध ठेवण्यात आल्या आहेत.
कॅन्सर डायग्नोस्टीक व्हॅनचे तालुकानिहाय शिविरांच्या ठिकाणाचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.
भेटीचा दिवस व तारीख
दि. 28/07/2025 सोमवार उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी
खालील लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी कॅन्सर डायग्नोस्टीक व्हॅन मधील तज्ञ डॉक्टर्स
यांच्यामार्फत तपासणी करून घ्यावी.
*३ आठवड्यापेक्षा अधिक तोंड किंवा जीभेवर घाव /३ आठवड्यापेक्षा अधिक काळचा खोकला
*तोंडामध्ये लाल किंवा पांढरा चट्टा आणे/तोंड उघडायला त्रास
*स्तनांमध्ये गाठ / स्तनाच्या आकारात बदल
*स्तनाग्रामधून (निप्पल) पू किंवा रक्तस्त्राव
*मासिक पाळी व्यतिरिक्त योनीतून रक्तस्त्राव
*मासिक पाळीचे चक्र बंद झाल्यावर रक्तस्त्राव होण
*शारिरिक संबंधानंतर रक्तस्त्राव होणे
*योनी मार्गातून दुर्गंधीयुक्त स्त्राव येणे.
> कर्करोगाचे संकेतः-
१) शरीरातील कोणत्याही अवयवामध्ये सुज येणे
२) तीळ, मस्सा यांच्या आकारात किंवा रंगात बदल होणे.
३) न भरणारी जखम
४) सतत ताप किंवा वजनात घट होणे.
५) ४ आठवड्यापेक्षा अधिक काळची अंगदुखी
आपल्या जवळच्या आरोग्य संस्थेतील सदरील तपासणीच्या तारखांची माहिती आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घेऊन जास्तीत जास्त लोकांनी आपली कर्करोगाविषयी तपासणी करुन घ्यावी असे जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान मार्फत आवाहन करण्यात येत आहे.

