You are currently viewing अनामिक सखी

अनामिक सखी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अनामिक सखी*

 

अचानक भेटली

अनामिक सखी

मोरपंखी हसून गेली

येऊन माझ्या उंबरठ्यावर

क्षणिक विसावली

अजून देहभान विसरून हिंदोळ्यावर बसते का?

तुझ्या शब्दांतून मोती सांडतात का ?

भारावतो का ? ओल्या मातीचा वास

पहिल्या पावसात भिजायला धावतेस का ?

भावलेल्या स्वप्नांची वही लिहीतेस का?

कधी सप्तसुरांचा संध्या राग आळवतेस का ?

सांग ना सखे

अधून मधून अशीच भेटशील का?

माझ्यात तू तुझ्यात मी

गुंतशील का ?

सांग ना सखे….!!

 

लेखिका/ कवयित्री

संगीता कुलकर्णी— ठाणे@

9870451020

प्रतिक्रिया व्यक्त करा