MSEB च्या वीज खंडितीमुळे जिओ नेटवर्क ठप्प;
फोंडाघाटमधील नागरिक त्रस्त, ५०० हून अधिक कनेक्शन दुसऱ्या कंपन्यांकडे वळले
फोंडाघाट
आज सकाळी ९ वाजल्यापासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत फोंडाघाट परिसरात MSEB कडून वीजपुरवठा पूर्णतः खंडित होता. याचा थेट परिणाम जिओच्या नेटवर्कवर झाला असून, तब्बल ८ तास जिओ सेवा पूर्णतः बंद होती.
या कालावधीत ऑनलाईन व्यवहार, पैशांचे व्यवहार, बँकिंग सेवा आणि अन्य महत्त्वाचे कामे पूर्णपणे ठप्प झाली होती. जिओ नेटवर्क पूर्णपणे वीजेवर अवलंबून असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या व्यतिरिक्त, एअरटेल व बीएसएनएल या नेटवर्क्सची सेवा मात्र सुरळीत सुरू होती, त्यामुळे अनेकांनी जिओच्या सेवेवर विश्वास ठेवणे बंद केले असून, फोंडाघाटमधील ५०० ते ६०० कनेक्शन दुसऱ्या नेटवर्ककडे वळल्याची माहिती आहे.
विना-पावसाच्या किंवा वाऱ्याशिवायही वारंवार वीज खंडित होणाऱ्या MSEB च्या व्यवस्थेवरही नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत मंत्री नितेश राणे यांच्याकडे तक्रार करून योग्य न्याय मिळेल, अशी अपेक्षा संवाद मिडिया प्रतिनिधी अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केली आहे.
