You are currently viewing श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.सौ. प्रतीक्षा सावंत सेवा निवृत्त

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.सौ. प्रतीक्षा सावंत सेवा निवृत्त

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.सौ. प्रतीक्षा सावंत सेवा निवृत्त

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचलीत श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ.सौ.प्रतीक्षा सावंत आपल्या नियत वयोमानानुसार महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाल्या. यानिमीत्त त्यांचा सत्कार सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारीणी सदस्य श्री जयप्रकाश सावंत, संस्थेचे सहसंचालक अॅड. शामराव सावंत यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल, सावंतवाडी पंचायत समिती माजी सभापती श्री भगवान देसाई ,प्रा. सतीश बागवे, श्री मनोहर देसाई डेगवे,बांधकाम व्यवसायीक श्री संजय सावंत,अॅड.प्रदिप सावंत महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राणिशास्राचे विद्यमान विभागप्रमुख डॉ. जी एस मर्गज यांनी केले. डॉ. प्रतीक्षा सावंत यांनी गेली 35 वर्ष महाविद्यालयामध्ये सेवा दिली. त्या मनमीळाऊ स्वभावाच्याव दुसरयांना मदत करणारया आहेत असे ते म्हणाले.
याप्रसंगी हिंदी विभागाच्या प्रा.सौ कविता तळेकर, वाणिज्य विभागाच्या प्रा. डाॅ.सौ सुनयना जाधव, प्रा. एम.ए. ठाकूर, प्राणीशास्र विभागाचे श्री ज्ञानेश्वर तळकटकर, इंग्रजी विभागाचे प्रा. बी एन हिरामणी, प्राणीशास्राचे माजी प्राध्यापक एस एच.महापुरे, वनस्पतीशास्राचे विभागप्रमुख डॉ.यु.एल. देठे, रसायनशास्राचे प्रा.दत्तप्रसाद मळीक, प्राणीशास्राचे श्री.ज्ञानेश्वर तळकटकर, पियुष सावंत ,सौ.समिता सावंत ,प्रीतम गिरीष, सौ.समीक्षा भानुषाली, सौ स्वाती सावंत ,कु. मृणाल देसाई यांनी आपली मनोगते व्यक्त केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी एल भारमल यांनी डॉ. प्रतिक्षा सावंत यानी प्राणीशास्र विभागामध्ये सहकारी म्हणुन ऊत्तम काम केले . श्री भगवान देसाई यांनी सौ प्रतिशत सावंत यांनी अतिशय कष्टाने उच्च शिक्षण प्राप्त केले याचा आवर्जून उल्लेख केला संस्थेचे कार्यकारी सदस्य श्री जयप्रकाश सावंत यांनी त्यांना निवृत्त निमित्त शुभेच्छा दिल्या अॅड. शामराव सावंत यांनी त्यांच्या निवृत्तीपर भाषणामध्ये त्यांच्या कामाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. जी .एस. मर्गज यांनी केले तर आभार हिंदी विभागाच्या प्रा.सौ. कविता तळेकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा