*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*एक आशेचा किरण*
जिथे अंधार फाटला
तिथे प्रकाश पडला
उभ्या जिवनात राया
जीव तुझ्यात अडला
गर्द अंधाऱ्या रात्रीला
एक ताऱ्याची संगत
घन घोर अंधाराला
दावी काजवा पंगत
रोज उगवता तारा
घालवितो अंधाराला
सख्या तुझ्यामुळे माझ्या
आली गोडी संसाराला
एक आशेचा किरण
त्याने अंधार फिटला
मन मनाशी जुळता
वाद प्रेमात मिटला
कवी:-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर ,धुळे.*
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७७.

