नाडकर्णी यांचे भाजपमध्ये पुनरागमन; पालकमंत्री नितेश राणेंची सदिच्छा भेट
निलंबन रद्दीनंतर एकनाथ नाडकर्णी यांची कणकवलीत नितेश राणेंशी चर्चा; पक्षकार्यासाठी पुन्हा सक्रिय होण्याचे आवाहन
कणकवली,
भाजप सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ज्येष्ठ पदाधिकारी एकनाथ नाडकर्णी यांचे पक्षातून झालेल्या निलंबनाची रद्द केली गेल्यानंतर त्यांनी आज पालकमंत्री ना. नितेश राणे यांची कणकवली येथील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये पक्षवाढीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
गतवर्षी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षशिस्त भंग केल्याच्या आरोपाखाली नाडकर्णी यांना भाजपमधून निलंबित करण्यात आले होते. अलीकडेच त्यांनी पक्षाकडे निलंबन रद्द करण्याची विनंती केली होती. त्यानुसार जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी नाडकर्णी यांचे निलंबन रद्द करत, त्यांच्या जुन्या योगदानाची दखल घेतली आणि त्यांना पक्षकार्यासाठी पुन्हा सक्रिय होण्याचे आवाहन केले.
आजच्या भेटीदरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांनीही नाडकर्णी यांना पक्षात पुन्हा स्वागत करत शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी संघटन बळकट करण्यावर भर देण्याची गरजही व्यक्त केली.
या भेटीला भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस, माजी अध्यक्ष सुधीर दळवी, आनंद तळणकर, वैभव इनामदार, संजय सातार्डेकर, प्रकाश गवस, संजय विरनोडकर, कळणेचे सरपंच श्री. देसाई, तळकटचे सरपंच सुरेंद्र सावंत, तुकाराम बर्डे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

