You are currently viewing आजगावात दोन एसटीची समोरासमोर धडक; २५ हून अधिक प्रवासी जखमी

आजगावात दोन एसटीची समोरासमोर धडक; २५ हून अधिक प्रवासी जखमी

सावंतवाडी :

आजगाव येथे वेंगुर्ला-पणजी व सावंतवाडी-वेंगुर्ला बसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यात दोन्ही बसच्या चालकांसह २५ हून अधिक प्रवासी जखमी झालेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी मळेवाड आरोग्य केंद्रात तसेच शिरोडा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात आज दुपारी ३.३० च्या सुमारास आजगाव डीएड कॉलेजलगत वळणावर झाला. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले.

सावंतवाडी आजगाव वाघबीळ नजीक दोन एस टी मध्ये भीषण अपघात झाला. यातील जखमीना उद्योजक पराग शिरोडकर यांनी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेऊन आले. तर काही जखमींना शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात देण्यात आले आहे.

यावेळी स्थानिक कार्यकर्ते अमित प्रभू, सचिन प्रभू, संतोष रेवाडकर, अशोक रेवाडकर, गणेश रेवाडकर, आनंद कळसुलकर, शुभम परब, सूर्या पांढरे, सुनील आजगावकर यांच्यासह ग्रामस्थांनी मदत कार्यात सहभाग घेतला. मुसळधार पाऊस असल्याने मदत कार्यात मोठी अडचण येत होती. उशिरा पर्यंत घटनास्थळी कोणीही एसटीचे अधिकारी अथवा पोलीस दाखल झाले नव्हते. तसेच जखमींची अद्याप पर्यंत माहिती मिळू शकली नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा