You are currently viewing कलगीतुरा..माझा चहासोबतचा..!

कलगीतुरा..माझा चहासोबतचा..!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कलगीतुरा..माझा चहासोबतचा..!*

 

बारा हत्तीचं बळं

चहा ढोसल्यावरचं येतं

मूठभरांची मक्तेदारी संपवाया

हिम्मत ताकद देतं..!

 

उत्सव असो..की उपद्रव

चहानेच पाठराखण केली

जात पंथ ….धर्माची

सामाजिक समरसता जपली..!

 

जगणं अर्थवाही करणारी

मिथकं चहाकट्टयानेचं सांभाळली

वाफाळलेल्या व्याकूळ शांततेत

चहानेचं उदासी घालवली..!

 

सन्मानाच्या पायघड्या आपसूकच

चहाच्या कट्ट्यावरचं उलगडली

माझीचं..गर्मी.. माझीचं..मर्जी

कलगीतु-याची प्रथा ..चहाने जपली.!

 

पूर्वग्रह बाजूला ठेवून…चहाचं

मनमोकळं प्रदर्शन करतो

माणसांत माणसाचं.. दर्शन देत

चहाचं…संन्यस्तवृत्ती धारण करतो ..!

 

कपाला कप भिडवतं…चहाचं…

जगण्यातला कलगीतुरा मिटवतो..

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा