*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला तालुक्यात ” महारक्तदान संकल्प ” शिबिराचे आयोजन*
वेंगुर्ला
मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्गच्या वतीने महारक्तदान संकल्प शिबिर आयोजित करण्यात आले आहे. “रक्तदान करूया, समाजासाठी काहीतरी करूया” या प्रेरणादायी घोषवाक्याखाली हे शिबिर उपजिल्हा रुग्णालय, शिरोडा येथे मंगळवार, २२ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ वाजता संपन्न होणार आहे.
सामाजिक जाणिवेतून आणि सेवा भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये स्थानिक नागरिक, तरुण वर्ग, स्वयंसेवी संस्था व विविध संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे. सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान – वेंगुर्ले , वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस, शिवप्रेमी ग्रुप – रेडी , ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना गांधी चौक – शिरोडा , सोनसुरकर व्यायामशाळा – शिरोडा , शिवप्रेमी मित्र मंडळ आरवली टांक या संस्थांचा या उपक्रमात विशेष सहकार्य लाभले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सामाजिक कार्य, संवेदनशील नेतृत्व आणि सर्वसामान्यांसाठी असलेली बांधिलकी ओळखून त्यांचा वाढदिवस समाजहितासाठी साजरा करण्याचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन युवावर्गाने समाजोपयोगी कार्यात पुढे यावे, असा संदेशही या शिबिराच्या माध्यमातून देण्यात येत असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले.
विशेषतः या शिबिरात नियमित व प्रेरणादायी रक्तदान करणाऱ्या ‘निमंत्रित रक्तदात्यांचा’ विशेष सन्मान आयोजकांच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यांच्या या योगदानामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले असून, त्यांची सेवा समाजासाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहे.
सदर शिबिरात सहभाग घेण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आले असून, “रक्तदान म्हणजे जीवनदान” हे लक्षात घेऊन जास्तीत जास्त नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व तालुकाध्यक्ष विष्णु उर्फ पपु परब यांनी केले आहे.

______________________________
*संवाद मीडिया*
*करिअरमध्ये नवा टप्पा! -*
*DIY फर्निचर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदासाठी संधी 🌟*
*आपण कॉलेज विद्यार्थी आहात का? फ्रेशर आहात का?*
*आपल्यासाठी एक सुवर्णसंधी!*
*🔹 पद:*
*DIY (Do It Yourself) फर्निचर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह*
*🔹 कामाचे स्वरूप:*
*आपल्या राहणीच्या भागात DIY फर्निचरचे प्रमोशन आणि मार्केटिंग करणे*
*स्थानिक बाजारपेठेतील ग्राहकांशी संपर्क साधणे*
*📍 लोकेशन्स:*
*कुडाळ / सावंतवाडी*
*🔹 अर्जदारांमध्ये अपेक्षित गुणधर्म:*
*👉फ्रेशर्ससाठी खुली संधी, योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात येईल*
*👉स्वतःची दुचाकी आणि वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक*
*👉उत्तम संवाद कौशल्य आणि लोकांशी सहज संवाद साधण्याची क्षमता*
*🔹 पगार आणि फायदे:*
*❇️ आकर्षक बेस पगार*
*❇️ कामगिरीवर आधारित इन्सेंटिव्ह्स*
*❇️ प्रशिक्षण कालावधीतही वेतन*
*🔹 संपर्क व अर्ज:*
*तत्काळ अर्ज करण्यासाठी संपर्क करा:*
*📞 7083606747*
*🔹 पत्ता:*
*📍शाळा नं.4 जवळ, साधले मेस रोड, गाळा नं.8 व 9, दत्तकृपा अपार्टमेंट, सावंतवाडी.*
*तयार आहात का? आपल्या भविष्यासाठी आजच एक पाऊल पुढे टाका!*
*DIY फर्निचर मार्केटिंगमध्ये तुमच्या उज्ज्वल करिअरची सुरू करा!*
*Advt link 👇*
https://sanwadmedia.com/177710/
______________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

