You are currently viewing दिपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त बांदा केंद्र शाळेत खाऊचे वाटप

दिपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त बांदा केंद्र शाळेत खाऊचे वाटप

*दिपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त बांदा केंद्र शाळेत खाऊचे वाटप*

बांदा

महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री व सावंतवाडी मतदार संघाचे विद्यमान आमदार दीपक भाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त बांदा येथील पीएम श्री जिल्हा परिषद केंद्र शाळेत विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
बांदा येथील शिवसेना पदाधिकारी यांच्या वतीने आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येतो.यावर्षी बांदा केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा उपप्रमुख अर्चना पांगम,, उपविभागीय अध्यक्ष सरीता तर्फे, सहअध्यक्ष श्रेया गोवेकर,उपतालुका प्रमुख भैया गोवैकर विभागीय अध्यक्ष राजेश विर्नोडकर , शिवसेना सदस्य दत्तप्रसाद महाजन , मुख्याध्यापक शांताराम असनकर उपशिक्षक जे.डी.पाटील, शुभेच्छा सावंत,उदय सावळ,स्नेहा घाडी, फ्रान्सिस फर्नांडिस,प्रसेन जित,मनिषा मोरे आदि उपस्थित होते‌ यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी गीताच्या स्वरूपात दिपकभाई केसरकर यांना शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा