*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।।गण गण गणात बोते ।। जय गजानन श्री गजानन ।।
___________________________
श्री गजानन विजयव काव्यांजली काव्यपुष्प -१०७ वे
अध्याय – १८ वा , कविता – ५ वी.
___________________________
एकदा समर्थ निघाले पंढरपुराला । श्री विठ्ठलाच्या दर्शनाला । होती मंडळी सोबतीला । या समयी ।। १ ।।
जगू आबा, पाटील हरी । बापुना व मंडळी दुसरी । थांबते झाले नागझरी दर्शनास साधू-गोमाजी समाधीच्या ।।२ ।।
पाटील सारे शेगावीचे । घेती दर्शन या समाधीचे । परिपाठ असे पाटलांचे । पंढरीस जातांना ।। ३ ।।
स्वामींच्या बरोबरी । असे पाटील हरी । काळे बापुना,व माणसे दुसरी । असती पाचपन्नास ।।४ ।।
दिवस वारीचा । आषाढ शुद्ध नवमीचा । लोंढा लोटला वारकऱ्यांचा । क्षेत्र पंढरपुरी ।। ५ ।।
जय जय रामकृष्ण हरी । जयघोष करी वारकरी । भक्तिभाव असे खरोखरी । सर्वांच्या मनात हो ।। ६ ।।
यात्रा मोठी जोरदार । चाले विठूनमाचा गजर । पूर भक्तांचा अपार । मंदिराच्या भवती ।।७ ।।
ईतर मंडळी सारी । आणिक पाटील हरी । गेली दर्शनास सारी। बापुना राहिला घरी ।।८ ।।
बापुना निराश झाला । त्याचा भाव स्वामींनी जाणला।
समर्थांनी त्यास दाविला । विठुराया साक्षात ।। ९ ।।
**********
करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास
__________________________
कवी अरुणदास” अरुण वि. देशपांडे- पुणे
__________________________
