रत्नागिरीत ‘यशाचा मंत्र’ – डॉ. महेश अभ्यंकर यांचे विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन
रत्नागिरी
VASAGADEKAR’S KAPSAN व KAPSAN INSTITUTE, कोटा यांच्या संयुक्त विद्यमाने JEE व NEET परीक्षेच्या तयारीसाठी ‘यशाचा मंत्र’ हा विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. डॉ. महेश अभ्यंकर, वैद्यकीय सल्लागार, फार्मास्युटिकल तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, संशोधक व लेखक, यांचे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन या कार्यक्रमात होणार आहे.
कार्यक्रम शनिवार, दि. 19 जुलै 2025 रोजी दुपारी 4 ते सायं. 6 या वेळेत फाटक हायस्कूल सभागृह, रत्नागिरी येथे होणार आहे. इयत्ता ११वीतील विद्यार्थी व पालकांसाठी हा कार्यक्रम विशेषतः उपयुक्त ठरणार आहे.
डॉ. अभ्यंकर यांचा 1500 पेक्षा अधिक वैद्यकीय चर्चांचा अनुभव, 10,000 हून अधिक पुस्तकांची विक्री (Emozeal), 50 हून अधिक प्रकाशित लेख आणि अभ्यासातील विविध पैलूंवर सखोल संशोधन ही त्यांची खासियत आहे.
कार्यक्रमाबाबत अधिक माहितीसाठी संपर्क:
श्री. विनायक निकम – मो. 8055037222
