मुंबई :
शिवसेना नेते माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांची कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मुंबई येथे राणे केसरकर यांची भेट झाली.
ज्येष्ठ नेते विकास सावंत यांच्या निधनामुळे मतदार संघातील वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द करत असल्याचे दीपक केसरकर यांनी जाहीर केले. आज मुंबई येथे पावसाळी अधिवेशन दरम्यान आमदार निलेश राणे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा राणेंनी केसरकर यांना दिल्या तसेच पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी जेष्ठ शिवसैनिक अण्णा केसरकर कोचरा सरपंच योगेश तेली आदी उपस्थित होते.

