अमरावती :
ज्या महाराष्ट्रात 2000 या वर्षात फक्त 23 मुले आयएएस होत होती ती संख्या आता 100 च्या जवळपास पोहोचली आहे. या कामासाठी महाराष्ट्रातील विविध संस्थांनी तसेच लोकांनी गेल्या पंचवीस वर्षात अथक परिश्रम केलेले आहेत. आता मोठ्या संख्येने मुले आयएएस होत आहेत. बिहार उत्तर प्रदेशनंतर आता महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर येऊन ठेपला आहे. ही टक्केवारी अजून वाढविण्यासाठी महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी व शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन मिशन आयएएस या संस्थेचे संस्थापक व सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा तज्ञ प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे.
शैक्षणिक संस्था व लोकप्रतिनिधी अनेक लोकांचे मंत्र्यांचे सत्कार आयोजित करतात. पण त्याला जोडूनच या आयएएस मुलांचा सत्कार घडवून आणला तर ही नवीन आयएएस झालेली मुले मुलांना स्पर्धा परीक्षेबाबत योग्य मार्गदर्शन करू शकतात. योग्य दिशा दाखवू शकतात आणि प्रत्यक्ष आयएएस झालेल्या मुलांच्या तोंडून त्यांची यशोगाथा ऐकून अनेकांना प्रेरणा मिळू शकते.
या कामी मुख्यमंत्र्याचे सचिव श्री श्रीकर परदेशी यांनी नांदेडला जिल्हाधिकारी असताना हा उपक्रम राबविला होता. दर महिन्याच्या पाच तारखेला नांदेडला स्पर्धा परीक्षा कार्यशाळा व्हायचे. त्याचे अनुकरण पुढे चंद्रपूर अकोला अमरावती येथे झाले. पण नंतर ते बंद पडले. पण अमरावतीचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्री आशिष येरेकर यांनी अमरावती जिल्ह्यातील आय ए एस झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार भव्य प्रमाणात आयोजित करून पूर्ण महाराष्ट्र समोर एक आदर्श ठेवला आहे. तसेच बीडचे जिल्हाधिकारी श्री विवेक जान्सन यांनी देखील अशा प्रकारची स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेऊन बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचा उपक्रम आखला आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये धनगर असलेल्या श्री बिर्जे यांचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एक धनगराचा मुलगा बिरू ढोणे आय ए एस होऊ शकतो या व्हिडिओने अनेकांना प्रेरणा दिली आहे. हा व्हिडिओ तर अनेक भाषेत भाषांतरित होऊन पूर्ण भारतात पसरला आहे. तसेच यवतमाळच्या मुस्लीम रिक्षा चालकाची मुलगी असलेल्या कु. अबीदा अमन आयएएस होऊन विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे.
महाराष्ट्रात साताऱ्याची रयत शिक्षण संस्था अमरावतीची श्री शिवाजी शिक्षण संस्था. अहमदनगरची मराठा शिक्षण संस्था नाशिकची मराठा शिक्षण प्रसारक मंडळ तसेच नागपूरची दत्ता मेघे यांची शिक्षण संस्था यासारख्या संस्थांनी पुढाकार घेऊन जर या आय ए एस मुलांचे सत्कार आयोजित केले तर नवीन पिढीला किमान त्यांच्या शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना योग्य मार्गदर्शन मिळेल व त्यातूनच भावी आय ए एस अधिकारी घडतील.
अमरावतीच्या मिशन आय ए एस.ने 25 वर्षापासून हा उपक्रम स्वबळावर राबविला आहे. आतापर्यंत या उपक्रमात 373 आयएएस अधिकारी सनदी अधिकारी राजपत्रित अधिकारी सहभागी झालेले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने अधिकारी सहभागी झालेली ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे. या संस्थेमध्ये मुख्य सचिव श्री जेपी डांगे मुख्य सचिव श्री रत्नाकर गायकवाड अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे प्रधान सचिव डा. श्रीकर परदेशी प्रधान सचिव श्री एकनाथ डवले यांच्यासारखे वरिष्ठ सनदी अधिकारी येऊन गेले आहेत. या संस्थेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून यावर्षी आयएएस झालेल्या विद्यार्थ्यांचा त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींनी व शिक्षण संस्थांनी सत्कार व मार्गदर्शन समारोह आयोजित करावा असेही आवाहन या निवेदनातून करण्यात आले आहे.
यावर्षी आयएएस झालेले सर्व विद्यार्थी आगष्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मसुरी येथे आय ए एस.चया ट्रेनिंगला जाणार असून तोपर्यंत ते त्यांच्या त्यांच्या गावात उपलब्ध आहेत. हे विद्यार्थी त्यांच्या परीने जनजागृती करितच आहेत. पण त्याला मर्यादा पडतात. या आय ए एस अधिकाऱ्यांकडे येणाऱ्या मुलांना पालकांना शिक्षकांना हे व्यक्तिगत मार्गदर्शन करीत आहेत .पण ते अपुरे आहे. म्हणून या संधीचा लाभ लोकप्रतिनिधींनी व शैक्षणिक संस्थांनी घ्यावा अशी विनंती या परिपत्रकात शेवटी करण्यात आली आहे.
मिशन आय ए एस. ने पुढाकार घेऊन आतापर्यंत अमरावती नागपूर अकोला वलगाव व चाळीसगाव जिल्हा जळगाव या ठिकाणी अशा प्रकारचे सत्कार समारोह आयोजित करून महाराष्ट्रसमोर एक आदर्श उभा केला आहे. मिशन आयएएस सारखी संस्था जर हे काम करू शकते तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी व शैक्षणिक संस्था निश्चितच हे काम भक्कमपणे करू शकतात. या कामी त्यांना काही सहकार्य लागल्यास सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची तयारी मिशन आय ए एस चे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे (9890967003) यांनी केली आहे.
प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प.
9890967003

