You are currently viewing मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेशाची संधी

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेशाची संधी

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेशाची संधी

सिंधुदुर्गनगरी

सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयांतर्गत मुला- मुलींच्या शासकीय वसतिगृहाकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मालवण, कणकवली व वेंगुर्ला अशा 3 ठिकाणी तसेच मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मालवण, कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ला व देवगड असे 5 ठिकाणी आहेत. या 8 शासकीय वसतिगृहामध्ये विदयार्थी, विद्यार्थीनीना सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध झाली, असल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले दिली आहे.

अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीयसह इतर प्रवर्गाच्या इयत्ता- आठवी, आकरावी, आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये रिक्त असणाऱ्या जागेवर विनामूल्य प्रवेश ऑनलाईन पध्दतीने देण्यात येणार आहे.

गरजू विद्यार्थ्यांनी  प्रवेशाबाबतचे  अर्ज संबंधित तालुक्याच्या वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडून प्राप्त करुन आवश्यक कागदपत्रांसह सादर करावेत. शासकीय वसतिगृहात विनामूल्य  निवास व भोजनासह शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, जिम व इंटरनेट वाय-फाय  आदी सुविधा विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येतात. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी तालुक्यास्तरावरील शासकीय वसतिगृहाचे  गृहपाल किंवा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांवर 02362 228882  संपर्क साधावा. असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.

शासकीय वसतिगृहाचे सन 2025 -26 साठीचे प्रवेशाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे

 

अ.क्रअभ्यासक्रमऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी
1शालेय विद्यार्थीदि. 17 जुलै 2025 पर्यंत
2इ.10 वी 11 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायिक अभ्यासक्र वगळूनदि. 23 जुलै 2025 पर्यंत
3बी.ए.,बी.कॉम, बी.एस.सी.अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवीका, पदवी आणि एम.ए.एम.कॉम, एम.एस.सी.असे पदवी नंतरचे पदव्युत्तर, पदवी, पदवीका इत्यादी अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून)दि.23 जुलै 2025 पर्यंत
4व्यावसायिक अभ्यासक्रव्यावसायिक अभ्यासक्रमाचे शासकीय वसतिगृह प्रवेशासाठीचे वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिध्द केले जाईल.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा