वजराठ ग्रामपंचायत उपसरपंच म्हणून सौ. दिपीका दिनकर राणे यांची बिनविरोध निवड
वेंगुर्ले
वजराठ ग्रामपंचायत उपसरपंच म्हणून आदर्श गिरेबर-सातेरी आदर्श गाव पॅनल च्या प्रभाग क्र. 3 च्या सदस्या सौ. दिपीका दिनकर राणे यांची बिनविरोध निवड करणेत आली.
राणे मॅडम या गावच्या माजी सरपंच असून त्यांचा गावच्या विकासात मोलाचा वाटा आहे. या पंचवार्षिक मधील त्या तिसऱ्या उपसरपंच ठरल्या आहेत. तरी या प्रसंगी गावच्या सरपंच सौ. अनन्या पुराणिक, माजी उपसरपंच. श्री. शामसुंदर पेडणेकर, सौ. केरकर मॅडम, सदस्य श्री. चेतन नाईक, श्री. कांदे, सौ. देसाई, गावचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री ताता परब, सोसायरी चेअरमन श्री बंड्या पेडणेकर, माजी सरपंच, अ. बा. परब, मनोहर परब, प्रेमानंद संदिप पेडणेकर, मकरंद, गोंधळेकर, नितीन सावंत, प्रेमानंद सावंत. भोसले, दिलीप वेंगुर्लेकर, दाजी विटेकर, जगन्नाथ दाभोलकर आदी उपस्थित होते. सर्वांचे आभार मावळते उपसरपंच श्री. पेडणेकर यांनी मानले.
