You are currently viewing जिल्ह्यात कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम

जिल्ह्यात कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम

जिल्ह्यात कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम

सिंधुदुर्गनगरी

 सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यामध्ये कर्करोगाची तपासणी व जनजागृती मोहिम सुरु करण्यात आली़, असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.

            या मोहिमेमध्ये कॅन्सर तपासणीची सुविधा असलेली सुसज्ज कॅन्सर डायग्नोस्टीक व्हॅन जिल्ह्यातील ग्रामिण भागात जाऊन तेथील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याच्या मदतीने रुग्णांची तपासणी करणार आहे.  कॅन्सर डायग्नेस्टीक व्हॅन दि.9 जुलै 2025 ते एक महिना कालावधीमध्ये जिल्हामधील जिल्हा, उपजिल्हा  ग्रामिण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कर्करोग संशयीत लाभार्थ्यांची तपासणी करणार आहे.

ग्रामिण रुग्णालय देवगड येथून या कर्करोग तपासणी सेवेची सुरुवात करण्यात आली असून जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी शिबिरास भेट देवून कामकाजाची पहाणी केली, तपासणी व्हॅनमध्ये तज्ञ डॉक्टरांबरोबरच तपासणी सुविधा उपलब्ध आहेत.

कॅन्सर डायग्नोस्टीक व्हॅनाचे तालुकानिहाय शिबिरांच्या ठिकाणाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

तालुका भेटीचा दिवस व तारीख संस्थेचे नाव
 

देवगड

दि. 09 जुलै 2025 ग्रामिण रुग्णालय देवगड
दि.10 जुलै 2025 प्राथमिक आरोग्य केंद्र पडेल
दि.11 जुलै 2025 प्राथमिक आरोग्य केंद्र मिठबांव
दि.12 जुलै 2025 प्राथमिक आरोग्य केंद्र पडेल
मावलवण दि.14 जुलै 2025 प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा
दि. 15 जुलै 2025  ग्रामिण रुग्णालय मावलण
दि. 16 जुलै 2025 प्राथमिक आरोग्य केद्र चौके

वेंगुर्ला दि. 17 जुलै 2025 प्राथमिक आरोग्य केंद्र परुळे
दि.18 जुलै 2025 प्राथमिक रुणालय वेंगुर्ला
दि. 19 जुलै 2025 उपजिल्हा रुग्णालय शिरोडा
दि. 21 जुलै 2025 प्राथमिक आरोग्य केंद्र तुळस
दोडामार्ग  दि. 22 जुलै 2025 प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी
दि.23 जुलै 2025  ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग
दि. 24 जुलै 2025  प्राथमिक आरोग्य केंद्र मोरगांव
सावंतवाडी  दि. 25 जुलै 2025 प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा
दि. 26 जुलै 2025 प्राथमिक आरोग्य केंद्र सांगेली
दि. 28 जुलै 2025 उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी
कुडाळ दि.30 जुलै 2025 प्राथमिक आरोग्य केंद्र माणगांव
  दि.31 जुलै 2025 महिला रुग्णालय कुडाळ
दि. 1 ऑगस्ट 2025 प्राथमिक आरोग्य केंद्र पणदुर
दि. 2 ऑगस्ट 2025  जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग
कणकवली दि.4 ऑगस्ट 2025 उपजिल्हा रुग्णालय कणकवली
दि. 5 ऑगस्ट 2025 प्राथमिक आरोग्य केंद्र कनेडी
दि.6 ऑगस्ट 2025 प्राथमिक आरोग्य केंद्र नांदगाव
दि. 7 ऑगस्ट 2025 प्राथमिक आरोग्य केंद्र फोंडा
वैभववाडी दि.8 ऑगस्ट 2025 प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डे
दि. 9 ऑगस्ट 2025 ग्रामिण रुग्णाल वैभववाडी,

प्राथमिक आरोग्य केंद्र वैभववाडी

खालीलप्रमाणे लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी कॅन्सर डायग्नोस्टीक व्हॅन मधील तज्ञ डॉक्टर्स यांच्यामार्फत तपासणी करून घ्यावी.

तीन आठवड्यापेक्षा अधिक तोंड किंवा जीभेवर घाव,3 आठवड्यापेक्षा अधिक काळचा खोकला. तोंडामध्ये लाल किंवा पांढरा चट्टा यणे, तोंड उघडायला त्रास, स्तनांमध्ये गाठ, स्तनाच्या आकारात बदल, स्तनाग्रामधून (निप्पल) पू किंवा रक्तस्त्राव, मासिक पाळी व्यतिरिक्त योनीतून रक्तस्त्राव, मासिक पाळीचे चक्र बंद झाल्यावर रक्तस्त्राव होणे, शारिरिक संबंधानंतर रक्तस्त्राव होणे, योनी मार्गातून दुर्गंधीयुक्त स्त्राव येणे.

कर्करोगाचे संकेत:- शरीरातील कोणत्याही अवयवामध्ये सुज येणे, तीळ, मस्सा यांच्या आकारात किंवा रंगात बदल होणे, न भरणारी जखम, सतत ताप किंवा वजनात घट होणे, 4 आठवड्यापेक्षा अधिक काळची अंगदुखी, अशी संकेत आहेत.

 आपल्या जवळच्या आरोग्य संस्थेतील तपासणीच्या तारखांची माहिती आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घेऊन जास्तीत जास्त लोकांनी आपली कर्करोगाविषयी तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग विभागामार्फत करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा