चांदणी…
तिच्या एका हास्यासाठी,
चंद्र सुद्धा जागतो.
आभाळात तिष्ठत तो,
रात्रभर थांबतो…
ती येते दबक्या पावलांनी,
चंद्र गालात हसतो.
रात्रीतल्या काळोखात जसं,
लक्ष नसल्याचे भासवतो..
लाजत मुरडत जवळ येता,
चंद्र गाल फुगवून बसतो.
जणू काय ती आल्यावर,
तो मुळीच खुश नसतो…
तिलाही ज्ञात असतं,
चंद्र आपलीच वाट बघतो.
तिच शोभा आभाळाची हे,
चंद्रही मनोमन जाणतो.
ती लुकलूकते,चमचमते,हसते,
चंद्र हळूच वाकून पाहतो.
नजरेस नजर भिडताच,
चंद्र नजरेतच फसतो.
म्हणून तर चंद्र रात्र रात्र,
चांदणीसाठीच तिष्ठत..
आभाळात थांबतो..
आभाळात थांबतो…!!
(दिपी)✒️
दीपक पटेकर.
८४४६७४३१९६