*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*जगी कुणी ना पूर्ण..*
लटपट लटपट दिलीस जिव्हा नको चालवू
माणसा तू
जगी कुणी ना पूर्ण ज्ञानी छात्रच सारे समजून घे…
जे दिलेत अवयव तुजला
मनी सेवाभाव ही रूजला
ऋषीमुनीजे सांगून गेले तथ्य त्यातील जाणून घे
जगी कुणी ना पूर्ण ज्ञानी…
ही जिव्हा लवलव करते
अन् नको तिथे ती डसते
केल्यावर फिरते पाणी
ती बनते रणरागिणी
लगाम घालावा व आवरावी ना तर पाजते पाणी
जगी कुणी ना पूर्ण ज्ञानी…
तुज सुज्ञ म्हणून पाठवला
देवाचा लाडका सुपुत्र
का विटाळून जिव्हेला
कुकृत्य तू करण्या धजला
भल्याभल्यांची इथे उतरते गर्विष्ठ नि जे अभिमानी
जगी कुणी ना पूर्ण ज्ञानी…
अति ज्ञानी असती नम्र
बघ समजून घे समुद्र
ना झऱ्यासम खळखळतो
मर्यादा नेहमी पाळतो
करीत गर्जना गाज त्याची काठ भिजवती, पाणी
जगी कुणी ना पूर्ण ज्ञानी..
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
