*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”व्यास महर्षी”*
व्यास भारतीय संस्कृतीचे शिल्पकार
प्रकटती जन उद्धाराया वारंवार।।धृ।।
जन्म द्वापर कलियुग संधिकाळात
असे वावर सर्वत्र ऋषींचे कुळांत
मात-पिता लाभे सत्यवती-पराशर।।1।।
संहिता केली सोपी वेद संस्कारांनं
समजावले वेदमंत्र सुरचनेनं
वेदव्यास प्रणाली ची महती अपार।।2।।
ब्रह्मसूत्रे निर्मिली जनतेच्या उद्धारा
शुकदेवां भागवत दिले जन प्रचारा
जय भारत पुराणें केला लोकोद्धार।।3।।
वेद विभाग केले रचिले भागवत
समता शिकवुन टाळले भेदाभेद
व्यास सांगी नाम करील जीवनोद्धार।।4।।
श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.

