*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*युगे अठ्ठावीस उभा*
अठ्ठावीस युगे
उभा एका विटेवर
आता उतर
भक्तांसाठी…
अवर्षण अतिवृष्टी
कष्टकर्यांनी किती झेलावं
आशेवर जगावं
तुझ्या…
हाती काम
मनात श्रध्दा भाव
त्यालाच ठाव
आयुष्य…
अतूट विश्वास
तुझ्यावर रे विठ्ठला
भजनी रमला
आळवत…
सोड हात
कमरेवरचे तुझे आता
दिनांचा त्राता
तूच….
दोनच शब्द
बोल त्यांच्याशी आपुलकीने
तुझ्याकडे आशेने
दर्शनास….
पूस डोळ्यातील
त्यांच्या आधी पाणी
ऐक गा-हाणी
मनातली…..
तूच भक्तसखा
भेट त्यांना ऊराऊरी
सफल वारी
तेव्हाच…..!!
°°°°~~~°°°°~~~
अरुणा दुद्दलवार@ ✍️

