You are currently viewing कृषि विभागाकडून तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती, जिल्हास्तरीय भरारी पथकांची स्थापना

कृषि विभागाकडून तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती, जिल्हास्तरीय भरारी पथकांची स्थापना

कृषि विभागाकडून तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती, जिल्हास्तरीय भरारी पथकांची स्थापना

सिंधुदुर्गनगरी

शासनाच्या निर्देशानुसार तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीची फेररचना करण्यात आली आहे. याअनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निविष्ठांच्या गुणवत्ता नियंत्रणाकरीता जिल्हास्तरीय भरारी पथक आणि तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीची फेररचना करण्यात आली, असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी दिली आहे.

जिल्हास्तरीय भरारी पथकाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी हे असून तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष उपविभागीय कृषि अधिकारी हे असून संबंधित तालुक्याचे कृषि अधिकारी (गुनि), तालुका कृषि अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग हे सदस्य सचिव आहेत.

जिल्हास्तरीय भरारी पथक पुढीलप्रमाणे:

पथकप्रमुख, कृषी विकास अधिकारी (जिल्हा परिषद), सिंधुदुर्ग, सदस्य, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, सिंधुदुर्ग, सदस्य 2, तक्रारीशी संबंधित तालुका वगळून अन्य तालुक्यातील तालुकास्तरीय गुणनियंत्रण निरीक्षक यांचा भरारी पथकामध्ये समावेश आहे.

तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती पुढीलप्रमाणे:

 अध्यक्ष – संबंधित उपविभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी, सदस्य – संबंधित तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी,  सदस्य – कृषी विद्यापीठ,कृषि संशोधन केंद्र, कृषि विज्ञान केंद्र प्रतिनिधी, सदस्य – महाबीज प्रतिनिधी, सदस्य सचिव – कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) कार्यालय संबंधित तालुका कृषी अधिकारी याचा तक्रार निवारण समितीमध्ये समावेश आहे.

कृषि निविष्ठांबाबत काही तक्रारी असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित तालुक्याचे तक्रार निवारण समितीशी किंवा जिल्हास्तरीय भरारी पथकाशी संपर्क साधावा असे कृषि विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे.

जिल्हास्तर भरारी पथक प्रमुखांचे सपंर्क क्रमांक,

जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी दिशांत कोळप मोबा. 9422171942,

जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सुशांत भोसले मोबा. 8275683885

तालुका स्तरीय तक्रार निवारण समिती प्रमुखांचे संपर्क क्रमांक,

कणकवली उपविभागीय कृषि अधिकारी, उमाकांत पाटील, मोबा.9403383524,

सावंतवाडी उपविभागीय कृषि अधिकारी अनिकेत कदम मोबा. 9960602233

प्रतिक्रिया व्यक्त करा