*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।। गण गण गणात बोते ।। जय गजानन श्री गजानन ।।
__________________________
श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प-१०६ वे
अध्याय -१८ वा, कविता- ४ थी
___________________________
श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण ।करा,होण्या शंका निरसन । होण्या भवतापांचे हरण । जावे गजानना शरण ।।१।।
राजाराम कवर नावाचा । निष्ठावान भक्त गजानानांचा ।
दुर्धर आजार त्याचा । होईना बरा काही केल्या ।।२।।
दूरदूरचे डॉक्टर आले । उपाय करून थकले । यश त्यांना नाही आले । भाऊचे दुखणे होई असह्य ।। ३।।
मग भाऊने एक केले । त्याने स्वामिस विनवले । तुम्हीच
पाहिजे काही केले । आता माझ्यासाठी ।।४।।
कवराची विनवणी । ऐकली स्वामींनी । मध्यरात्री आली । एक दमणी ,भाऊच्या दारापाशी ।।५ ।।
निजल्या जागेवरून भाऊस दिसले । एक ब्राह्मण आलेले ।
कवराच्या बंधूंनी विचारले । कुठून येणे केले ? ।।६।।
ब्राह्मण बोले । गजा नाम माझे भले । शेगावाहून येणे झाले।
भाऊस तीर्थ अंगारा देण्यासी ।।७ ।।
लाविता तीर्थ अंगारा । फोड फुटला भराभरा । भाऊस धीर आला जरा । व्याधी बरी झाली त्याची ।।८ ।।
पुढे भाऊ बरा झाला ।तो स्वामींच्या दर्शनाला। शेगावी आला । स्वामींना भेटला ।।९ ।।
समर्थ म्हणती भाऊला । ब्राह्मण तीर्थ अंगारा देऊन गेला ।
त्याच्या गाडी बैला । तू नाही चारा दिला ।।१०।।
भाऊस मग उमजले। ब्राम्हणरूपात स्वामी आले । कृपा करूनिय गेले। भक्तवत्सल गजानन स्वामी ।। ११।।
*********
करी क्रमशः लेखन कवी अरुणदास
__________________________
-कवी अरुणदास ” अरुण वि. देशपांडे – पुणे.
___________________________

