*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम लेख*
*’गुरु म्हणजे ज्ञानाचा प्रकाश’*
*समृद्ध जीवनासाठी गुरू आवश्यक*
****************************
गुरू बिन ज्ञान अधुरा असं म्हटलं जातं ते खरं आहे कारण गुरू असल्याशिवाय ज्ञान मिळत नाही विद्यानामं प्राप्तेनं: गुरू शरणंम, अर्थात विद्या मिळवायची असेल तर गुरूला शरण गेले पाहिजे गुरूच्या सानिध्यात राहूनच ज्ञान मिळवता येते.माणसाच्या जीवनात मार्गदर्शक असला की आयुष्यात कसलीच अडचण येत नाही एक कुशल प्रशासक उत्तम कामगिरी करण्याचं प्रशिक्षण देत असतो.म्हणून कुठल्याही क्षेत्रात गुरू असल्याशिवाय ज्ञान मिळत नाही.गुरू आपल्या जीवनाचा शिल्पकार असतो त्याच्या आज्ञेनुसार आपण घडतो.माणसाचे जीवन उत्तम होण्यासाठी त्याला गुरू असणे आवश्यकच आहे.गुरूच्या सहवासातून चांगले संस्कार मिळतात तथ: उत्तम प्रगती होते.म्हणून प्रत्येकाच्या जीवनात मार्गदर्शकाचे महत्त्वाचे स्थान आहे.गुरूच स्थान हे परमेश्वरा इतकेच मोठे शिवाय शिष्याच्या मनात परमेश्वराप्रती जेव्हढी श्रद्धा आहे तेव्हढीच श्रध्दा, भक्ती गुरूंवर ही असायला हवी.गुरु ही विभूती अशी असते की ती आपल्या शिष्यांना ईश्वरप्राप्तीचा योग मार्ग दाखवतो.म्हणून गुरू शिवाय काहीच साध्य होत नाही.
गुरू-शिष्य संबंध हा भारतीय संस्कृतीत महत्वाचा मानला जातो. गुरु आणि शिष्य यांच्यातील नाते केवळ ज्ञानाची देवाणघेवाण नाही, तर आध्यात्मिक आणि नैतिक विकासाचा मार्ग आहे. गुरु आपल्या शिष्याला योग्य ज्ञान,मार्गदर्शन आणि संस्कार देऊन त्याला योग्य मार्गावर चालण्यास मदत करतात.तेव्हा प्रत्येकाच्या आयुष्यात गुरू असतो.खरतर आपले प्रथम गुरू आईवडील असता त्यांच्यामुळे चांगले संस्कार मिळतात.
आईवडीनंतर माझ्याही जिवनात मला अनेक गुरू लाभलेत ज्यामुळे मी घडलो.तेव्हा साहित्यिक क्षेत्रातले प्रथम गुरू म्हणजे *प्रा डॉ फुला बागुल सर* .नवापूर हे माझ्यासाठी पंढरपूर तर *प्रा डॉ फुला बागुल सर* म्हणजे माझ्यासाठी विठ्ठल आहेत. कारण त्यांनी मला कडेवर घेतले नसते तर आज साहित्याची पताका घेऊन मी साहित्यक्षेत्रातला वारकरी झालो नसतो.मी त्या़च्या इतका किंवा इतरांसारखा उत्तम लेखक जरी नसलो तरी मला आदरणीय प्रा फुला बागुल सरांनी लिहिते केले म्हणून मी नावा रुपाला आलो. *प्राचार्य डॉ व संपादक श्री कृष्ण पोतदार सर तसेच श्री विकास कपोले सर यांच्या सहकार्याने दै.आपला महाराष्ट्रमधे* माझे अनेक लेख कविता प्रकाशित झालेत.दै आपला महाराष्ट्रमुळेच मी नावारूपाला आलो प्रत्येकवेळी माझे लिखाण दैनिकात प्रकाशित करून मला महत्त्वाचे स्थान मिळवून दिले.माझ्या कथा कविता अनेक वाचकांपर्यंत पोहचवण्याच फार मोठं योगदान *दै. आपला महाराष्ट्रच* आहे.आपलही एखाद गाण कुठल्यातरी चित्रपटात यायला असं वाटतं असताना. *आदरणीय विश्राम बिरारी सारांई ‘नदारीना संसार’* या अहिराणी चित्रपट प्रथम संधी दिली आणि माझं गाणं प्रसारित झाले. *प्रा.डॉ संजीव गारासे* यांच्या मार्गदर्शनाखाली माझं पहिला ‘वळणं’ कथा संग्रह प्रकाशित झाला.*प्रा.सुनंदा वैद्य मॉडम* यांचा खऱ्याअर्थाने मला साहित्यक्षेत्रात
सुसंस्कृत करण्यात लाखमोलाचा सहभाग आहे.माझ्या गुरू माता वैद्य मॉडम नसत्या तर मला फार काही चांगलं लिहता आले नसते.
साहित्य क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय काम करणारे नामांकित गझलकार *आदरणीय बाळासाहेब गिरी सर* हे सर्व बाजूंनी सक्षम आहेत पण या एव्हढ्या मोठ्या माणसाने मला त्यांच्या ह्रुदयात कायमस्वरूपी
जागा देऊन नाण्याची एक बाजू जर मी असेल तर दुसरी बाजू तुम्ही आहात असं सांगून त्यांनी मला खूप मोठी श्रीमंती दिली.माझ प्रत्येक लिखाण त्यांच्याकडे संग्रहीत आहे शिवाय लिखाणात काही बदल व मार्गदर्शन ही सर प्रत्येक वेळी करत असतात.खरतर मी खूप छोटा माणूस आहे माझ्या गुरूंनी व माझ्या गुरू समान मित्रांनी मला खूप खूप प्रेम आणि मार्गदर्शन देऊन मोठं केले.माझ्यासारख्या साहित्यिकाला *प्रा.नरेद्र खैरनारसर,प्रा सदाशिव सुर्यवंशीसर ,आदरणीय शिवाजी आप्पा ,आदरणीय कैलासनान भामरे, श्री ज्ञानेश्वर भामरे, श्री देवदत्त बोरसे सर ,आदरणीय नानाभाऊ माळी,श्री प्रविण माळी, आदरणीय अजय बिरारीसर, श्री विजय निकम सर श्री दिनेश चव्हाण सर सौ.मंगला रोकडे मॉडम.यांनी मला नेहमीच वेळोवेळी सहकार्य केले.मी अहिराणी भाषेत लिहावं यासाठी* *आदरणीय जितेंद्र देसले सर* जिद्दीलाच पेटले मी अहिराणीत लिहिलंच पाहिजे असा त्यांचा हट्ट मी आज काही अंशी पुर्ण करतोय .आज मी जे काही अहिराणी भाषेत लिहितोय त्याच सर्व श्रेय *आदरणीय जितेंद्र देसले* सारांना जात *आदरणीय सुभाष अहिरेसर व आदरणीय रामदास वाघसर* यांच नेहमीच मार्गदर्शन मिळत असते, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्याचा नावाचा गजर आहे ते *लोककवी प्रा.प्रशांत मोरे* माझे वर्गमित्र असल्याचा मला अभिमान आहे. आज त्यांची साहित्यिक उंची उदंड जरी असली तरी ते मला गुरू समान आहे.त्याच्या कविता एकूण मला लिहण्याची प्रेरणा मिळत असते. वरील सर्व गुरूवर्य व मित्र यांच्या मार्गदर्शनाखाली मी लिहिता झालो हे नसते तर ज्याच्या अनेक कथांवर आधारित मराठी चित्रपट निघालेत, रंगभूमीवर नाटकं होतात. असे ख्यातनाम ग्रामीण कथाकार *जेष्ठ साहित्यिक आदरणीय श्री बबनराव पोतदार* सरांचा मी मानसपुत्र झालो नसतो.तेव्हा सरतेशेवटी एकच सांगेन हि सर्व साहित्यिक मंडळी माझ्यासाठी वंदनीय आहे.हे आहेत म्हणून साहित्यिक गोतावळ्यात माझं आव आहे.म्हणून *गुरूपौर्णिमा* हा दिवस गुरुजनांचा आदर करण्याचा आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. या दिवशी,आपण आपल्या गुरुजनांचे स्मरण करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत.खरच गुरु आपल्या जीवनात अत्यंत महत्वाचा आहे.तो आपल्याला योग्य मार्गावर चालण्यास, ज्ञानाने समृद्ध होण्यास आणि आत्म-साक्षात्कार करण्यास मदत करतो. त्यामुळे, गुरुचे महत्व आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.
*संजय धनगव्हाळ*
*अर्थात कुसुमाई*
९४२२८९२६१८
९५७९११३५४७

