*कोकण साहित्य भूषण गुरुवर्य स्व. विद्याधर भागवत यांचे पुण्यस्मरण*
वालावलचे सुपूञ, कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक सदस्य आणि जेष्ठ साहित्यिक स्व. विद्याधर भागवत यांची आज पुण्यतिथी. आज गुरूपोर्णिमा आपल्या गुरूंचे मनोभावे स्मरण करून गुरूंचा आशिर्वाद घेण्याचा दिवस. या दिवसाचे औचित्य साधून कुडाळ येथे आज विविध संस्थाच्या वतीने भागवत सरांचे स्मरण करण्याचा स्तुत्य उपक्रम पार पडला.
कुडाळ हायस्कुलचे निवृत्त मुख्याध्यापक श्री. का. आ. सामंत, भागवत सरांच्या जुन्या सहकारी श्रीमती सुलभा देसाई, त्यांचे शिष्य व सामाजिक कार्यकर्ते अॅड नकुल पार्सेकर यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. श्री पार्सेकर यांनी सर गुरू म्हणून किती श्रेष्ठ होते याची आठवण करून दिली. यावेळी कुडाळ एम्. आय्. डि. सी. इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, उपाध्यक्ष डॉ. नितीन पावसकर, पदाधिकारी श्री अमीत वळंजू, प्रमोद भोगटे, श्री कुणाल ओरसकर,शशिकांत चव्हाण, रोटरी क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री राजीव पवार, श्री दिनेश आजगावकर, श्री गजानन कांदळगावकर आदि मान्यवर उपस्थित होते.

