You are currently viewing गुरु मार्गदर्शक

गुरु मार्गदर्शक

*ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार संपादक बाबू फिलिप्स डिसोजा कुमठेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गुरु मार्गदर्शक*

 

इथे केवळ गुरूच सराईत

जीवनाचा इथे अवघड घाट

पार कराया निर्विघ्न सुरक्षित

गुरूवीण कोण दाखविल वाट

-१-

हात धरून करी मार्गदर्शन

आश्वासक वचन कृती अचाट

कडेे कपारी चढ उतार नग

निवारी कष्ट गुरूकृपा अफाट

-२-

हिंस्र श्वापदे विषारी प्राणी भय

समोर जंगल अनोळखी दाट

पूर्वसूरींनी रूळली होती कधी

तृणात हरविली ती पायवाट

-३-

पूजा अर्चना ध्यान धारणा तंत्र

प्रभाव ज्यांचे तेच भोवती भाट

भोळ्या भक्तीला ज्ञात नसतो मंत्र

नाम चिंतन बस पुरेसा थाट

-४-

जग रहाटी स्मरे संकटी गुरू

श्रध्दा असता उठे भक्तीची लाट

गुरू महात्म्य अगाध लीला स्मरू

अघटित घटना तर्क अकाट

-५-

बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर

पुनावळे पुणे ३३

प्रतिक्रिया व्यक्त करा