You are currently viewing विठोबा

विठोबा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक, अध्यक्ष कोमसाप सावंतवाडी लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम गझल*

 

मंजूघोषा वृत्त

*विठोबा*

 

टाळतो मी वाट गर्दीची विठोबा

प्रश्न धरु का कास वारीची विठोबा

 

तू मुखी अन् तूच ध्यानी सर्वकाले

तरि मनी या आस भेटीची विठोबा

 

कीर्तने जनजागृती होते खरे रे

पण गरजही खास दर्दीची विठोबा

 

धावतो तू संकटी हाकेस तेंव्हा

जोड असते त्यास भक्तीची विठोबा

 

वैष्णवांचा मेळ जमतो पंढरीला

ओढ पंढरिच्याच मातीची विठोबा

 

का विटेवर तू उभारी हे कळाया

मज जरूरी दिव्य दृष्टीची विठोबा

 

तू विटेवर कर कटी पण धावती जन

ही तुझ्या रे जाण शक्तीची विठोबा

 

 

©®दीपक पटेकर (दीपी)

सावंतवाडी

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा