मसूरे:
मसुरे मर्डे येथील श्री स्वामी समर्थ मठामध्ये गुरुवार दिनांक १० जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ८ वाजता अभिषेक, एकादशमी, ११ वाजता सत्यनारायणाची महापूजा, महाआरती व तीर्थप्रसाद, दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता महाआरती, रात्रौ ८ वाजता स्थानिकांची सुश्राव्य भजने असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांचा लाभ स्वामीभक्तांनी घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ ट्रस्ट मर्डेवाडी मसुरे ट्रस्टचे अध्यक्ष श्री बाबुराव प्रभुगावकर यांनी केले आहे.

