*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम अभंग रचना*
*विठुराया*
————————————————-
हात जोडोनिया । मागणे करितो ।
कल्याण इच्छितो । विठूराया ।।
अमंगल सारे । दूर ते करावे ।
मंगल करावे । विठूराया ।।
लेकरे तुमची । आली दरबारी ।
घ्यावी हो पदरी । विठुराया ।।
जाऊया पंढरी। पाहण्या श्री हरी
आनंद अंतरी । अनुभवा ।।
पाहुनी तुम्हासी । दिलासा मिळतो ।
आधार मिळतो । विठूराया ।।
अरुणदासाची । सदा विनवणी ।
श्रीहरी चरणी । घडो सेवा ।।
*******
जय पांडुरंगा । हरी पांडुरंगा ।।
————————————————
अरुणदास”अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342
————————————————-

