मालवण – कसाल मार्गावरील कर्लाचाव्हाळ येथे डंपर अपघात..
मालवण :
मालवण – कसाल मार्गावरील कर्लाचाव्हाळ येथील वळणावर बुधवारी दुपारी चौके येथून मालवणच्या दिशेने चीरे वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाचा ताबा सुटला. याचवेळी अचानक ब्रेक मारल्याने डंपर रस्त्यावर पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून डंपरचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच चौके- कार्लाचाव्हाळ परिसरातील ग्रामस्थ डंपर व्यावसायिक यांनी अपघातस्थळी धाव घेत जखमी डम्पर चालकाला प्राथमिक उपचारासाठी चौके ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी काही काळ या मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. अखेर ग्रामस्थांनी दोन जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावर पलटी झालेला डंपर बाजूला केला व वाहतूक सुरळीत केली. यावेळी मालवण पोलीस स्टेशनचे पोलीस चौके क्षेत्रातील बिट अंमलदार प्रतीक जाधव, वाहतूक शाखेचे पोलीस देऊलकर घटनास्थळी उपस्थित होते.


