*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम लावणी*
*बोला की हो मराठी*
——————————
येता जाता येस फेस करता ही हौस कश्यासाठी?
इथे जन्मला इथे वाढला मग बोला की हो मराठी
या भाषेला किती गोडवा
म्हणी,ओवितूनओघाळतो
अभंग आणि भारूडातुनी
जनाजना मधे पाझरतो
संतांची ही असे पुण्याई,सदैव आमुच्या पाठी
इथे जन्मला, इथे वाढला मग बोला की हो मराठी
या बोलीची सुंदर वसने
दर कोसावर सापडती
तिथल्या मृदगंधाला
जगात साऱ्या पोचवती
नका उपेक्षू मायमराठी, नको कपाळी आठी
इथे जन्मला, इथे वाढला मग बोला की हो मराठी
साऱ्या भाषाभगिनींना
या बोलीने आपले केले
बंधुत्व आणि एकतेचे
संदेश साऱ्यांना दिले.
बोल हिताचे शाहीर सांगे, ठेवा आपुल्या गाठी
इथे जन्मला, इथे वाढला मग बोला की हो मराठी
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
9130861304
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
@ सर्व हक्क सुरक्षित

