*मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मालवण तालुका काँग्रेसचे सरचिटणीस महेंद्र मांजरेकर विजयी*
*शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा 6 विरूद्ध 2 मतांनी केला पराभव*
मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मालवण तालुका काँग्रेसचे सरचिटणीस महेंद्र मांजरेकर विजयी झाले. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार शशीकांत नाटेकर यांचा 6 विरूद्ध 2 मतांनी दणदणीत पराभव केला. एक मत बाद ठरविण्यात आले.
जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख, जिल्हा उपाध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक संचालक मेघनाद धुरी, मालवण तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस यांनी पुष्पहार घालून महेंद्र मांजरेकर यांचे अभिनंदन केले. यावेळी जिल्हा सचिव संदेश कोयंडे, आनंद परूळेकर, मालवण सेवादल अध्यक्ष चंदन पांगे, मालवण अल्पसंख्याक अध्यक्ष सरदार ताजर, महेश परब, चिंदर ग्रामपंचायत सरपंच नम्रता महंकाळ, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते

